प्रथम पुरस्कार - श्री गणेश हिंगणीकर
👑 प्रथम पुरस्कार 👑
......
दि. 1 जुलै 1979 रोजी जगदंब महाविद्यालय, अचलपुर येथे (Bsc - Bio.) 🏢शाखेत प्रवेश घेतला.
जेमतेम 2 महीन्यांचा कालावधी लोटला होता.
नगरपरीषद अचलपुर लीपीक, चपराशी, लेखापाल, ई....👨✈पदाकरीता जाहीरात प्रसिध्द झाली होती. वडील वर्ष 1974 ला सेवानिवृत झाले होते. आपण सुध्दा अर्ज सादर करावा, अशी मनोमन ईच्छा होत होती. लिपीक पदासाठी टंकलेखन इंग्रजी 30 शब्द व मराठी 40 शब्द (प्रती मिनिट) ही अट होती. आणि आनंदाची बाब म्हणजे या दोन्ही परीक्षेचा निकाल नुकताच लागला होता.
मी प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण झालो होतो. आनंदी आनंद चोहीकडे;
परंतु विज्ञान पदवीधर होता येणार नाही याची खंत होती. आपली आर्थिक परीस्थिती याचा सुध्दा विचार होता.
Shri Ganesh Hingnikar |
श्री.आ.पी नंदा हे प्रशासक म्हणुन होते. श्री. अग्नीहोत्री व श्री. कडू हे नाका निरीक्षक म्हणुन होते. नगर परीषदचा आर्थिक स्त्रोत म्हणजे. जकात कर हे ऊत्पन्न कोणत्याही परीस्थीतीत वाढलेच पाहीजे. अशाप्रकारचे आदेश श्री.नंदा सरांनी दिले.
माझी नियुक्ती अमरावती रोड नाका क्रमांक 1 वर होती. ड्युटी रात्री 10:00 ते सकाळी 6:00 वाजेपर्यत होती. रात्री होणारा जकात चोरी ही चिंतनाची बाब होती. माझा नाका अतिशय महत्वाचा होता. शहरात येणारा 80 टक्के माल हा अमरावती वरूनच यायचा.
अचलपुर चावलमंडी मधील एक व्यापारी जकात चोरीत तरबेज असुन त्याला आजपर्यत पकडण्याची हिम्मत कोणी केली नव्हती. माझेसोबत अमरलाल किराये नावाचा चपराशी होता. जकात चोरी पकडायची म्हणजे माल गावात कधी येणार याची पक्कि बातमी असणे गरजेचे होते. चावलमंडीतील दुकानावर, गोडावुन वर नजर ठेवण्यास सुरवात केली. वारंवार गोडावुन कडे होणारे चकरा पाहुन नोकरांना संशय आला. व आम्ही काही विचार करण्याचे आधी 3 ते 4 इसमांनी आम्हास मारण्यास सुरवात केली. अमरलाल पहीलवानंच होता. परंतु अचानक हमल्याने तोही विचारात पडला. परंतु समयसुचकता दाखवुन एकाची काडी मी पकडली. अमरलाल सुध्दा भानावर आला होता. आता आमचा प्रतीकार वाढला होता. रात्रीचे 10:30 वाजले होते. पोलीस गस्तीची सिटी वाजली, व दुकानदाराचे नोकर पळायला लागले. आम्ही सुटकेचा श्वास घेतला. आतातर याला कोणत्याही परीस्थीतीत पकडायचेच हा निर्धार मनाशी पक्का केला होता. चार पाच दिवसाचे गॅप नंतर माल कधी येणार याची खबर घेतली. बातमी 100% खरी होती.
सोमवारी सेठ ची मेटडोर अमरावतीला जात आहे. बातमी सरापर्यत पोहचवली. इशारे ठरले, सर कार्यालयाची MZR3151 ही शासकीय मेटाडोर घेवुन रात्री 11:00 वाजता अमरावती नाक्यावर हजर झाले, मी नाक्याचे बेरिअर मुद्दाउन उघडे ठेवले होते. रात्री मुख्यरस्त्याने गाडीचा वेग व आवाज स्पष्टयेत असल्याने मी सावध होवुन प्रत्येक गाडीचा वेध घेत होतो. रात्री 12:00 वा. पर्यंत इतर गाड्या येत होत्या, जकात कर गाडी थांबवुन घेणे सुरू होते. काहीना exit pass बाहेरगावच्या गाड्या देणे सुरू होते.12:30 झाले. ज्याची वाट पाहणे सुरू होते ते सावज वाट पहायला लावत होत.. तर बातमी खोटी तर नाही ? अशी शंका लगेच मनात यायची..
मीच मले सावरायचो.
2:00 वाजले, गाडीतील अधिकारी चितेंत पडले. खबर खोटी असल्याचं त्यांनी बोलून दाखविल; मी धीर दिला सर गाडी 100% येणार म्हणजे येणारच. इतक्यात मला दुरूनच गाडीचे लाईट दिसायला लागले. मी सिटी वाजवुन सरांना सावध केल. 2:20 मिनिटांनी सुसाट वेगात हवी असलेली गाडी नाका पार करून गेली. आम्ही लगेच गाडीच्या मागे आमची गाडी लावली. अचलपुर नाका, जिवनपुरा माळवेश पुरा, आला. दुकानदाराचा ड्रायव्हर चलाख होता.
आपला पाठलाग सुरू आहे हे त्वरीत त्याच्या लक्षात आलं होत. तो गाडीचा वेग सतत वाढवत होता. कसेहीकरून गाडीला अचलपुर नगर परीषद हद्दीत पकडणे गरजेचे होते. नाहीतर हातात आलेले सावज सुटणार होत. चावलमंडीत दुकानासमोर न थांबता गाडी वेगात तहसिल रोड ने कोर्ट रोड वर वळली 100 मीटर अंतरावर आम्ही होतो. गाडी 70 ते80 कि.मी/ प्रती वेगाने पळत होती. लालपुलाजवळ दुकानदाराचा ड्राॅइव्हर गोंधळला. त्याठिकाणी एक रस्ता बी.एस्.पी. काॅलेज मागील बाजुला वाघामाता मंदीराकडुन होता. व दुसरा रस्ता अजंनगाव रस्त्याला मिळणार होता. वाघामाता मंदीर रस्त्याने ड्राॅइव्हरने गाडी आत टाकली, रस्ता अतिशय खराब होता.
खड्डयात पुढील चाक फसले निघता निघेना. पाठीमागे आम्ही होतोच. ड्राईव्हर चे प्रयत्न फसले होते. आम्ही गाडीचा ताबा घेतला. मी गाडीची चाबी 🔑ताब्यात घेतली. दुकानदाराचे माणसानी प्रतीकार केला नाही. सकाळचे 3:20 मी. झाले होते.
मेटाडोर मध्ये जवळपास 2 लक्ष रुपयांचा साड्या, शर्ट, पॅन्ट पिस व इतर 🚚 साहित्य होतो. ओपन डिलेव्हरी करून पंचनामा करण्यात आला. 4000/- रूपयाचा नाका वाचविल्या बद्दल 40000/-💵 (चाळीस हजार) दंड आकारण्यात आला. मी योजलेली मोहीम फत्ते झाली होती.
अधिकारी वर्गा कडून कौतुक 👍 झाले. जकात करात लक्षणीय वाढी करीता घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे पुरस्कारासाठी शिफारसीनुसार, दि. 26 जानेवारी 1980 ला;
मा. दासगुप्ता जिल्हाधिकारी यांचेकडून शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्राने 🥇 गौरविण्यात आले. या ""प्रथमपुरस्काराने" जीवन फुलु🌹 लागले.
🚫~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~👑
🙏
No comments