Breaking News

https://g.page/inspiring-india-amravati

प्रयत्नांती परमेश्वर प्रसंन्न होतो- श्री गणेश हिंगणीकर

प्रयत्नांती परमेश्वर प्रसंन्न होतो



  दि. 28 फेब्रुवारी 2007 ला सायंकाळी 5:00 वा. मी चिखलदरा तालुक्यातील वडापाटी येथे सिमेंट बंधारा कामाची पाहणी करीत होतो.👨‍✈ *इतक्यात मोबाईलची रिंग* खणखणली. अहो (सौ.)चा फोन आई ( सौ. सुमती हिंगणीकर) ला डाॅक्टर आशिष भंसाली कडे भरती केल🏥 आहे. लवकर परस्पर दवाखान्यात या, वेळेच गांभीर्य ओळखुन लगेच दौरा आटोपता घेतला. आणि 30 मिनिटांत दवाखान्यात हजर झालो.


      माझे 2 जावई, 2 बहीणी👩‍👩‍👧‍👦 चुलत भाऊ तेथे हजरच होते. हृदयविकराचा तिव्र झटक्याने आई ची स्थिती अतिशय नाजुक होती. डाॅक्टर ने औषधोपचार सुरू केले होते. तब्यत चांगली होईल या आशेवर 20 दिवसाचा कालावधी उलटला होता.
        आई 75 वर्षाची होती, औषधिंना पाहीजे त्या प्रमाणात पतीकार (Response)देत नव्हती. अचलपुर चे सर्व मित्र मंडळी, व सगेसोयरे दवाखान्यात येऊन आईची चौकशी करत. अमरावती हलवायच काय..? या वर सुध्दा बराच विचार विनिमय झाला होता. मी सुटीवर असल्याचे व आई गेल्या 35 दिवसापासुन दवाखान्यात आहे.
     हे आमचे उपसंचालक👨‍🎨 डाॅक्टर दिलीप गुजर यांना समजले. सर भेटण्यासाठी दवाखान्यात आले. आई ची चौकशी केली, मला धिर दिला व *न* ❌ घाबरण्याचा सल्ला दिला. सरांसोबत वाहने साहेब सुध्दा होते. दवाखान्यातुन निघतांना सर म्हणाले आई ची तब्यत ठीक होत आहे.
        तुम्ही कामावर रुजु व्हा आपणास लोणाझरी येथील मातीचा बंधारा 15 जुन पर्यत पुर्ण करून या पावसाळयातील पाणी तेथे अडविणे आहे. 49 दिवसानंतर आई ला घरी नेण्याची परवानगी भेटली. आई ला घरी आणले होते. सौ., माझे 2 बहीणी अचलपुरलाच असल्याने  आई ची काळजी घेणे सोपे झाले होते.
         15 एप्रील ला मी कामावर 🏃‍♂ रुजू झालो, व लगेच लोखंडे ईजिंनिअर  सोबत लोणाझरी येथे 48 मीटर लांब; 6 मीटर ऊंच; आकाराचे बंधारा कामास सुरूवात केली. गावाला लागुनच काम असल्याने व मजुरी सुध्दा दर आठवडी मिळत असल्याने मजुर जोमात काम करीत होते. एप्रील महीना कधी संपला व मे ची 25 तारीख कधी जवळ आली हे कामाच्या ओघात कळलेच नाही.
       बंधारा चे माती काम जवळपास संपत आले होते. गावातील शनवारे नामक कास्तकाराने काळी माती देवुन बंधारा कामास मोलाचे सहकार्य दिले होते. मे 2007 संपुन जुन महीन्याची 15 तारीख एकादिवसावर आली होती.
      अजुन दगडांचे पिचींग व आऊटलेट चे काम बाकी होते. काम करता करता जुन ची 24 तारीख ऊजाडली, आकाशात ढग जमु लागले विजांचा कडकडाट सुरू झाले. आऊट लेट चे काम सुरू केले परंतु कठिण खडक लागल्याने काही केल्या खोदकाम होत नव्हते. मजुर थकले , जे.सी.बी. ने प्रयत्न केला काही केल्या खडक फुटेना. नाईलाज झाला होता.
           पाऊस जोरात सुरू झाला तर या कल्पनेनेच अगांवर काटे येत होते, 2 महीन्याची मेहनत, झालेला खर्च, नाही तो विचार डोक्यात येत होते. दिनांक 27 जुन उजाडली.
           सकाळी सकाळी मला🚜 माझ्या कंत्राटदार मित्राची आठवण झाली. बंडु हंतोडकर रा. अंजनगांव शासकीय कंत्राटदार यास लगेच फोन लावला सर्व परिस्थिती सांगितली, व लगेच अजंनगांव येथे पोकलॅन्ड आणण्यासाठी गेलो.
          ड्राईव्हर साबुलाल  सह लोणाझरीचा प्रवास सुरू झाला.  साबुलाल हा कामात निष्णात होता. सतत 75 तास तो पोकलॅन्ड वर होता. ( नैसर्गीक क्रिया साठी फक्त खाली ऊतरत होता.) 5 मीटर रुंद व 3 मीटर खोल व 50 मीटर लांब आकराचे खोदकाम करून 30 जुन 2007 तारखेची सायंकाळ झाली होती. पोकलॅन्ड साईट वरून बाहेर काढत नाही, तोच धो.. धो.. पाऊस सुरू झाला होता.
         ⛈आपले काम थांबण्याची जसी काय वाटच पाहत होता. 30 तारखेला सुरू झालेला पाऊस 1जुलै 2007 रोजी थांबला. बंधारा पाण्याने तुडूंब भरला होता.
        गावकरी , समितीचे पदाधिकारी, माझे सर्व सहकारी , 🥳आनंदाला पारावर नव्हता. जे मिशन हाती घेतले होते ते पुर्ण झाल्याचा वेगळाच आनंद होता. आनंदांत केलेल्या कामाची तारीफ सर्व गावकरी करीत असतांनाच 07 जुलै 2007 ऊजाडले. सकाळ पासुन सुरू झालेला पाऊस रात्री 2:00 वाजता थांबला. 
            294 मि.मि.पावसाची नोंद झाली. एवढ्या पावसात सुध्दा बंधारा जागेवरच होता.ऑक्टोबर महीना  दिवाळीच्या गावकरी यानं शुभेच्छा दिल्या.
    या प्रयत्नांमुळे पिकाचे नियोजन केले व वर्ष 2007 पासुन दरवर्षी 2019 पर्यत जवळपास 400 क्वींटल गहु,🌽🍑🍋🍇 ई...मुबलक पाणी व त्यामुळे दुधाचे व खवा चे ऊत्पन्नात वाढ झाली.


          गावकरी आनंदात आपले जिवन जगत असुन त्याच्या आनंदी जगण्यासाठी आपण सुध्दा खारीचा वाटा ऊचलला आहे. या विचाराने मन भरून येते.
म्हणूनचं म्हटले आहे......

         "प्रयत्नांती परमेश्वर......." ही म्हण सार्थ होते.

      - लेखक :- श्री गणेश हिंगणीकर

                     

No comments